⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

कन्नड घाटात पाच तास झालेल्या वाहतूक कोंडीने प्रवासी घामाघूम

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२२ । कन्नड घाटातील सतत हाेणारे अपघात व त्यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक समस्येमुळे वाहनधारकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कन्नड घाटात १७ रोजी सकाळी ७.३० वाजता १ ट्रक, १ आयशर गाडी फेल झाल्यामुळे तब्बल पाच तास वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांना माेठा त्रास सहन करावा लागला.

कन्नड घाटात दाेन गाड्या फेल झाल्याने तब्बल ५ तास वाहतूक ठप्प झाली हाेती. तर लग्नाची मोठी तिथी असल्याने घाटात वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती. सकाळी ७.३० ते १२.३० वाजेपर्यंत वाहतूक ठप्प होती. दरम्यान, चार महिन्यांपूर्वीच घाटाची दुरुस्ती करून अपघातांचे प्रमाण व वाहतूक वारंवार जाम होण्याच्या घटना वाढतच आहे. सकाळी ७.३० वाजता घाटात वाहनांची रांग लागून वाहतूक ठप्प झाल्याची माहिती मिळल्यानंतर पाेलिसांनी कारागीर बोलावून फेल झालेल्या दोन्ही वाहने दुरुस्त केली. त्यानंतर ५ तासापासून बंद झालेली वाहतूक सुरळीत झाली.