जळगाव जिल्हाबातम्या
माहेश्वरी महिला संघटनेतर्फे बसस्थानकात पाणपाेई
जळगाव लाईव्ह न्यूज ।२२ मे २०२२ । जळगाव शहरातील व तालुक्यातील माहेश्वरी महिला संघटनेतर्फे बसस्थानकात प्रवाशांसाठी पाणपाेई सुरू केली आहे. त्यामुळे प्रवाशांना थंड पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. दरराेज ५० बॅरल पाण्याचे वाटप केले जात आहे.
पाणपोईच्या या स्तुत्य उपक्रमासाठी चंचल तापडिया, अरुणा मंत्री, कल्पना काबरा, ऊर्मिला झंवर, स्नेहलता लाठी, वासंती बेहडे, किरण झंवर, सुरेखा कोठारी, सरला पोरवाल, उषा राठी, नीता दहाड, दीपाली काबरा, मनीषा तोतला, पुष्पा दहाड, संध्या मुंदडा यांचे सहकार्य लाभत आहे, असे संघटनेच्या कल्पना काबरा यांनी कळवले आहे.
जळगाव येथील बसस्थानकात पाणीवाटप प्रसंगी माहेश्वरी समाज संघटनेच्या सदस्या.
|