⁠ 
सोमवार, डिसेंबर 2, 2024
Home | जळगाव जिल्हा | मियावाकी वनसंवर्धन प्रकल्पाचा उद्या शुभारंभ; साडेसात हजार वृक्षांची लागवड

मियावाकी वनसंवर्धन प्रकल्पाचा उद्या शुभारंभ; साडेसात हजार वृक्षांची लागवड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | १० जुलै २०२३ | एसआयपी अकादमी आणि जळगावच्या पर्यावरण शाळेच्या वतीने खेडी (कढोली) शिवार, ता. एरंडोल येथे मियावाकी वनसंवर्धन प्रकल्प कार्यान्वित करण्यात येत आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ 11 जुलै रोजी सकाळी 9 वाजता होईल. लोकसहभागातून हा प्रकल्प साकारत असून या ठिकाणी साडेसात हजार स्थानिक प्रजातींच्या वृक्षांची लागवड केली जाणार आहे.

याप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही एल. माहेश्वरी, जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल, खासदार उन्मेश पाटील, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, केशवस्मृती सेवा संस्था समूहाचे प्रमुख भरतदादा अमळकर, आमदार चिमणराव पाटील, आमदार सुरेश भोळे, एस.आय.पी. अकादमीचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश व्हिक्टर, संचालक सीबी शेखर, संचालिका सरला कुलशेखरन, शिवाकाशी येथे पंचविसपेक्षा अधिक मियावाकी वन निर्माण करणारे सेलवाकुमार उपस्थित राहणार आहेत.

गेल्या चार महिन्यापासून या प्रकल्पाचे प्रारंभिक काम सुरू आहे. या उपक्रमाला भारत विकास परिषद, बळवंत नागरी सहकारी पतपेढी, विद्यापीठाच्या एनएसएसचे सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमात पर्यावरणप्रेमी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन या उपक्रमाचे संयोजक राजेंद्र नन्नवरे यांनी केले आहे.

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.