आमच्याकडे का पाहिले, या कारणावरून एका तरुणाला बेदम मारहाण

जुलै 4, 2022 4:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२२ । एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरुन एका तरुणाला तीन जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण करत तीक्ष्ण हत्याराने जखमी केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 22 jpg webp

तोशल अर्जुन कोळी (वय १८ रा.आसोदा) यांनी पोलिसात फिर्याद दिली. तोशल हा रविवारी दुपारी गावातील बहिणाबाई उद्यान येथे फिरत असताना त्याने समाधान हाडे, अभिषेक भालेराव व आणखी एक जण यांच्याकडे बघितले. आमच्याकडे पाहिले, या कारणावरुन समाधान हाडे, अभिषेक भालेराव व आणखी एक जण अशा तिघांनी शिवीगाळ करत तोशल यास मारहाण करण्यास सुरुवात केली. यात अभिषेक याने तोशील याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. तर एकाने तोशील यास पकडून ठेवत समाधान हाडे याने तोशील यास लाकडी काठीने डोक्यावर तसेच उजव्या हातावर मारहाण केली.

दरम्यान, या घटनेत तोशील हा जखमी झाला आहे. याने एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार समाधान हाडे, अभिषेक भालेराव व आणखी एक अनोळखी तरुण अशा तीन जणांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विलास शिंदे हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now