⁠ 
मंगळवार, डिसेंबर 3, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव मनपा आयुक्तांच्या बदलीसाठी भाजपच्या माजी नगरसेविकेची थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार

जळगाव मनपा आयुक्तांच्या बदलीसाठी भाजपच्या माजी नगरसेविकेची थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२४ । निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच ठिकाणी तीन वर्षपिक्षा जास्त काळ झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. परंतु, जिल्ह्यात सलग चार वर्ष कार्यरत असलेल्या महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड या अजुनही कायम आहेत. त्यांचे राजकीय पक्षांच्या कार्यकत्यांसोबत वैयक्तिक हितसंबंध तयार झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने त्यांची बदली करण्यासाठी भाजपच्या माजी नगरसेविका अॅड. शुचिता हाडा यांनी थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली.

लोकसभा निवडणुकीसाठी केव्हाही आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या दृष्टीने प्रशासनातील एकाच ठिकाणी तीन चषपिक्षा कार्यरत अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका राज्यात सुरू आहे. दरम्यान, माजी नगरसेविका अॅड. हाडा यांनी मनपा आयुक्त डॉ. गायकवाड यांच्या बदलीसाठी थेट केंद्रीय निवडणूक आयुक्तांकडे १६ फेब्रुवारी रोजी पत्रव्यवहार केला, कोणताही अधिकारी जो निवडणूक प्रक्रीयेशी थेट जोडला गेला असेल अशा अधिकाऱ्याला दीर्घ कालावधीपासून सेवेत ठेवता येत नाही, परंतु जळगाव महापालिकेच्या आयुक्त डॉ. गायकवाड या गेल्या चार वर्षांपासून जिल्ह्यात नियुक्त आहेत. फेब्रुवारी २०२० मध्ये त्यांची अमळनेर नगरपरिषदेत नियुक्ती झाली.

त्यानंतर त्या गेल्या तीन वर्षापासून महापालिकेच्या सेवेत आहेत. तीन वषपिक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी न ठेवण्याचा शासनाचा उद्देश आहे. निवडणुकीत १५०० अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या होतात. त्यामुळे एकाच ठिकाणी असलेल्या आयुक्तांचा त्यांच्यावर प्रभाव पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पारदर्शक पद्धतीने निवडणूक होण्यासाठी त्यांची बदली करण्याची मागणी अॅड. हाडा यांनी केली आहे. या तक्रारीचा ई-मेल त्यांनी केंद्रीय व राज्य निवडणूक अधिकारी, नगरविकास प्रधान सचिव, विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.