⁠ 

पाचोऱ्यातील पुरातन श्री राम मंदिरात राम जन्म उत्सव साजरा

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२१ । पाचोऱ्यातील पुरातन श्री राममंदिरात आज दुपारी 12.20 रामजन्म उत्सव साजरा करण्यात आला. सर्व सरकारी नियमाचे पालन करून हा उत्सव साध्या व कमी लोकांन मध्ये साजरा झाला. श्री राममंदिरात सजावट करण्यात आली.

श्री रामच्या बालरूपी मूर्तीला पाळण्यात ठेऊन आरती भजन म्हणण्यात आले. तसेच विविध फळाचे नैवद्य अर्पण केले. तसेच संचारबंदी असल्या कारणाने भाविकांना 11 वाजेच्या आत नियम पालन करून दर्शन घेऊ दिले 11 वाजे नंतरमंदिरात प्रवेश नाकरण्यात आला आहे.

 मंदिराचे महंत श्रीरामचरणदास महाराज श्री राममंदिर पाचोरा व  शिष्य नीलकंठदास महाराज.राममंदिर पाचोरा यांनी सर्व पूजा, आरती, विधी केला व भाविकांनी विन्नती केली आहे. सध्याची परिस्थिती पाहता भक्त भाविक यांनी संचारबंदी मोडू नये सर्व सरकारी नियम पालन करून रामजन्म उत्सव घरातील देवघरात साजरा करावा.