भाजपचं ठरलं! पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक स्वबळावर लढणार

एप्रिल 13, 2023 11:32 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२३ । राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका येत्या काही दिवसात पार पडणार आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. दरम्यान, पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक भाजप (BJP) स्वबळावरच लढणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपाच्या वतीने बहुसंख्य उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केले आहेत.

pachora krushi bajar jpg webp

पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक दि.२८ एप्रिल २०२३ शुक्रवार रोजी होणार आहे. तसेच या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी सोबत काही समविचारी उमेदवार निवडणूक लढणार आहे.ही निवडणूक भाजपा तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती सतीषबापु शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार असून या निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मतदारांशी आपला स्वतंत्र संपर्क सुरू केलेला आहे.

आपण ही निवडणूक स्वबळावर लढणार आहोत. तरी आमदारांनी केलेल्या कुठल्याही प्रकारच्या अफवांना मतदारांनी व कार्यकर्त्यांनी बळी पडु नये. तसेच भाजपा पाचोरा व भडगांव तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते एकसंघ असुन या निवडणुकीसाठी ताकदीने कामाला लागले आहे.असे तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे व आमदारांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे आमदार दुसऱ्या पक्षांचे प्रवक्तेपद बळजबरीने उसने भाड्याने घेतल्यासारखे पत्रकार परिषदा घेत फिरत आहेत.त्यांची स्वबळावर निवडणुका लढवण्याची ताकत पूर्णपणे खचली असल्याणे आमदारांना व त्याच्या उर्वरित उमेदवारांना कुठलाही आत्मविश्वास उरलेला दिसत नाही.

ज्या आमदारांना पूर्वी भाजपा नकोशी होती. भाजपाच्या नावाने आतापर्यंत ते आकांड तांडव करत होते.भाजपा कार्यकर्त्यांना चुकीच्या पद्धतीने त्रास देत होते.त्यांना आज अचानक भाजपाची गरज का पडतेय ? त्यांना भाजपाची आठवण येण्याची उपरती का झाली ? असे प्रश्न यावेळी भाजपाचे भडगाव तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकात उपस्थित केले आहे.

तसेच 20 तारखेला माघारी नंतर भाजपा व समविचारी उमेदवारांच्या प्रचारांत भारतीय जनता पार्टीचे पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व कार्यकर्ते पूर्णपणे स्वतःला झोकून देऊन काम करतील असे शहराध्यक्ष रमेश वाणी यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. तसेच आमदारांनी मेळाव्यात व पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांना योग्यत्या ठिकाणी पुराव्या निशी उत्तर देऊन त्यांचा खरा चेहरा मतदारांसमोर उघडा करू.असे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी सदर पत्रकात म्हटले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now