जळगावात ऑक्सिजन बेड मिळत नाहीये? ‘या’ नंबरवर कॉल करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२१ । जळगावमध्ये ऑक्सिजन बेड मिळत नसल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून फार वाढल्या आहेत. ग्रामीण भागातून येणाऱ्या अनेकांना जळगाव शहरात आल्यावर नेमकं कोणाशी संपर्क करावा? बेड कुठे उपलब्ध आहेत? हेच कळत नाहीये.

जळगावातील केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित कोविड केअर सेंटर येथे तज्ञ डॉक्टरांसह ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध  आहे. जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असाल अथवा जळगाव जनता बँकेचे सभासद असाल तर तुम्हाला शुल्कात विशेष सवलत देखील देण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह कोविड केअर सेंटर जळगाव येथे तुम्ही 7776811111 , 9420000244 या नंबर द्वारे संपर्क साधू शकता.

जळगाव जिएमसी खाटा प्रवेश व्यवस्थापन समितीचा नंबर 9356944314 हा असून येथे शासकीय रुग्णालयात खाटा उपलब्ध आहे काय याची माहिती दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षास 0257-2217193 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.