⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

गेट‎ परीक्षेत विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश‎

जळगाव‎ लाईव्ह न्यूज । ४ मे २०२२ । जळगाव येथील कवियत्री बहिणाबाई चौधरी‎ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रसायन‎ तंत्रज्ञान संस्थेतील बी. टेक. अंतिम‎ वर्षातील आठ विद्यार्थ्यांनी‎ गेट-२०२२ परीक्षेत घवघवीत यश‎ संपादन केले आहे.‎ खरगपूर येथील भारतीय‎ प्रौद्योगिकी संस्थान यांनी गेट या परीक्षेचे आयोजन केले होते.‎

विद्यापीठाच्या बी. टेक.‎ अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाच्या‎ निखील पाटील, स्वप्नील पाटील, संदेश कलंत्री, कृष्णा मुळे, वरद‎ नेरकर, सुयोग गाढवे, प्रतिल झोडे‎ आणि चैताली बारमासे या‎ विद्यार्थ्यांनी गेट परीक्षा उत्तीर्ण केली.‎ आाय.आय.टी. व एन.आय.टी.‎ मधील अभियांत्रिकी पदव्युत्तर‎ अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तसेच‎ भारत सरकारच्या नामांकित‎ कंपन्यांमध्ये नोकरी प्राप्त करणेसाठी‎ गेट परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक‎ असते. या विद्यार्थ्यांचा कुलगुरु प्रा.‎ व्ही. एल. माहेश्व री यांच्या हस्ते‎ सत्कार करण्यात आला. यावेळी‎ संचालक प्रा. जे. बी. नाईक, गेट‎ परीक्षा तयारीसाठीचे समन्वयक डॉ.‎ तुषार देशपांडे, डॉ. राजकुमार‎ सिरसाम, डॉ. महेंद्र बारी, डॉ. जितेंद्र‎ नारखेडे, डॉ. रवींद्र पुरी, डॉ. उज्वल‎ पाटील उपस्थित होते. प्राध्यपाकांनी‎ यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे‎ काैतुक करुन त्यांनी आगामी‎ करिअर विषयी मार्गदर्शन केले.‎ त्यांच्या शंकाचे निरसरन केले.‎