---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा धरणगाव

संतापजनक ! सुनेवर सासर्‍यानेच केला बलात्कार ; जिल्ह्यात खळबळ

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२३ ।  धरणगाव तालुक्यात 19 वर्षीय विवाहित सुनेवर सासर्‍यानेच अत्याचार केल्याची संतापजनक घटना धरणगाव तालुक्यातील एका गावात घडली. या प्रकरणी पीडीतेने भोपाळ येथे तक्रार नोंदवल्यानंतर अधिक तपासार्थ हा गुन्हा धरणगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

crime 1 jpg webp

शेतात व घरात अत्याचाराचा आरोप
19 वर्षीय विवाहितेच्या तक्रारीनुसार, 29 मार्च ते 11 एप्रिल 2023 च्या दरम्यान संशयित आरोपी असलेल्या सासर्‍याने शेतात व राहत्या घरात वेळोवेळी जबरदस्तीने शारीरीक संबंध निर्माण केले. या प्रकरणी पीडीतेने भोपाल येथे पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आल्यानंतर तो तपासार्थ गुन्ह्याची कागदपत्रे जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयात पाठवण्यात आली व पोलीस अधीक्षकांनी गुन्ह्याच्या तपासार्थ कागदपत्रे धरणगाव पोलिसांकडे पाठवल्याने पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार करीत आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---