जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२२ । संपूर्ण देशासह राज्यात मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरे केले जात आहे. मात्र या उत्सवाला एक विरजण लावणारी बातमी समोर अली आहे. कारण सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या गणपतींपैकी सातवा गणपती म्हणून संबोधल्या जाणाऱ्या तळे हिप्परगा येथील मशरूम गणपतीचा सोन्याचा कळस बुधवारी पहाटे चोरीला गेला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हा कळस २५ किलोचा होता तर त्याला २८ तोळे सोन्याच्या मुलामा देण्यात आला होता. सहा वर्षांनंतर दुसऱ्यांदा चोरट्यानं हे धाडस केलं आहे. यामुळे नागरिक चिंतीत झाले असून पोलीस याचा तपास करत आहेत.

सोलापूर शहरापासून जवळच असलेले तळे हिप्परगा येथील मशरूम गणपती शहराचं भूषण मानलं जातं. मंगळवारी रात्री पुजाऱ्यांनी नित्य नियमित पूजा आटोपून मंदिर बंद करण्यात आले होते. पुजारी संजय पतंगे पहाटे चारच्या सुमारास नित्य पूजेच्या निमित्ताने उठले. मंदिरात येण्यापूर्वीच सर्वप्रथम कळसाचं दर्शन घेण्याची त्यांची नेहमीची सवय होती. त्यानुसार त्याप्रमाणे पाहताच कळस चोरला गेल्याचे त्यांना समजले. त्यांनी तातडीने भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी यांना सादर बाब सांगितली. तातडीने सोलापूर तालुका पोलीस ठाण्याशी साधून झाल्या प्रकाराची कल्पना देण्यात अली व पोलीस हजर झाले. पुजारी संजय निंबाळकर यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद नोंदवली आहे.













