⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | चोपडा | चोसाकाकडे थकीत १३ कोटींपैकी ७५ टक्के रक्कम महिनाअखेर देणार

चोसाकाकडे थकीत १३ कोटींपैकी ७५ टक्के रक्कम महिनाअखेर देणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२२ । चोपडा’च्या चोसाकाकडे थकीत १३ कोटींपैकी ७५ टक्के रक्कम महिनाअखेर देणार आहे. अशी माहिती रविवारी बाजार समितीच्या सभागृहात पार पडलेल्या बैठकीत कृती समितीचे समनव्यक एस.बी.पाटील यांनी दिली.

चोसाकाकडे २०१४-१५ च्या हंगामातील ६०० रुपये प्रतिटनाप्रमाणे, तीन हजार शेतकऱ्यांचे सुमारे १३ कोटी १३ लाख रुपये थकीत आहेत. यासंदर्भात रविवारी बाजार समितीच्या सभागृहात बैठक पार पडली. प्रतिटन थकीत ६०० पैकी ४५० रुपये फेब्रुवारीअखेर आणि उर्वरित १५० रुपये पुढील वर्षाचा हंगाम सपल्यानंतर शेतकऱ्यांना दिले जातील, अशी माहिती बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी बैठकीत दिली. कृती समितीने न्यायालयात लढा उभारला नसता, तर कदाचित पैसे मिळाले नसते. महिनाअखेर शेतकऱ्यांची थकीत ७५ टक्के रक्कम मिळणार असल्याने आनंद आहे, अशी माहिती कृती समितीचे समनव्यक एस.बी.पाटील यांनी दिली.

जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल यांनी स्वतः तीन कोटींचा धनादेश देण्याची तयारी दाखवली, असे पाटील यांनी सांगितले. माजी मंत्री अरुण गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ऍड.संदीप पाटील पैसे मिळवण्यासाठी आग्रही होते. बैठकीत माजी आमदार कैलास पाटील, चोसाका चेअरमन अतुल ठाकरे, व्हाईस चेअरमन शशिकांत देवरे व अन्य संचालकसह तसेच कृती समितीचे सदस्य भागवत महाजन आदी उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह