जळगाव जिल्हाजळगाव शहर

मातोश्री आनंदाश्रमात जेष्ठ नागरिकांसाठी खेळ महोत्सवाचे आयोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जानेवारी २०२२ । सावखेडा शिवार परिसरातील केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित, मातोश्री आनंदाश्रम परिसरात प्रथमच जेष्ठ नागरिकांसाठी २३ ते २५ जानेवारी दरम्यान खेळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बादलीत बॉल टाकणे, संगीत खुर्ची, 50 मी. व 75 मीटर जलद चालणे, अंताक्षरी, उत्स्फूर्त श्रमदान स्पर्धा घेतल्या गेल्या. स्पर्धेत ९६ वर्षीय हरिभाऊ मांडवगडे यांचा सर्व स्पर्धेत सक्रिय राहिला व ८६ वर्षीय हुनाजी तळेले यांचे नियोजन या स्पर्धेचे वैशिट्य राहिले. मातोश्री आनंदाश्रमात सद्य:स्थितीत ४५ वृद्ध निवासी असून सर्व वृद्धांनी आपले वयोमान, शारीरिक व्याधी विसरून स्पर्धेत सहभाग नोंदवला.

विजयी स्पर्धक असे
सर्व कार्यक्रमात उत्साहाने सहभाग नोंदविल्या बद्दल अष्टपैलू खेळाडू हरि मांडवगडे
बादलीत बॉल टाकणे प्रथम नाना बागुल, शांताबाई चौधरी
५० व ७५ मी. जलद धावणे प्रथम राजू कुळकर्णी, द्वितीय मालनबाई कुमावत
संगीत खुर्ची प्रथम उत्तम साळवे, द्वितीय कुसुम निमगळे
अंताक्षरी प्रथम शरद साळवे, द्वितीय शांताबाई चौधरी
उत्स्फूर्त श्रमदान उत्तम साळवे, शेख हारून, साहेबराव सपकाळे, शरद साळवे, शालिक पाटील, शांताबाई चौधरी, मालतीबाई जोशी, मालनबाई कुमावत

स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ २६ रोजी कान, नाक, घसा रोग तद्न्य डॉ दिपक पाटील, ममता ललवाणी, प्रकल्प प्रमुख अनिता कांकरिया, संजय काळे, नीलिमा चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना महावीर ज्वेलर्स यांनी बक्षिसे प्रायोजित केली होती. स्पर्धा यशस्वितेसाठी राकेश भोई, पंकज पाटील, नवल पाटील, रुपेश भोई, गोपाल तगडपल्लेवार यांनी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button