⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | चांदोरकर प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारी जळगावात ‘पाडवा पहाट’ मैफल

चांदोरकर प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारी जळगावात ‘पाडवा पहाट’ मैफल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ नोव्हेंबर २०२१ । शहरात दरवर्षी पाडव्याच्या दिवशी चांदोरकर प्रतिष्ठानतर्फे दिवाळी पाडवा पहाटचे आयोजन करण्यात येते. गेल्या दोन वर्षांपासून काेराेना महामारीमुळे दिवाळी पाडवा पहाट या प्रात:कालीन संगीत सभेचे आयोजन चांदाेरकर प्रतिष्ठानला करता आले नाही; परंतु यंदा दरवर्षीप्रमाणे ५ नाेव्हेंबर राेजी सकाळी ६ वाजता महात्मा गांधी उद्यानात प्रतिष्ठानतर्फे बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवानिमित्ताने प्रातःकालीन संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदा पाडवा ५ नोव्हेंबर रोजी येतोय आणि याच दिवशी जागतिक रंगभूमी दिन असल्याने हा दुग्धशर्करा योग जळगावकर रसिकांना अनुभवयास मिळणार आहे. यावर्षी पाडवा पहाट ही मैफल सुगम संगीताची असून, मराठी मनाेरंजन चॅनेलवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ या रियॅलिटी शोच्या विजेत्या कलाकार सन्मिता धापटे शिंदे या आहे. सन्मिता उच्चविद्याविभूषित असून त्यांनी एमए म्युझिक व पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायकॉलॉजिकल कौन्सिलिंग यामध्ये केलेला आहे.

पाडवा पहाट या कार्यक्रमाला संगीताला तबल्याची साथ पुण्याचे चारुदत्त फडके, संवादिनीची साथ अभिषेक शिनकर, पखवाजची साथ गणेश फापळ हे करणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महापौर जयश्री महाजन, चांदसरकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष नाना वाणी उपस्थित राहणार आहेत, असे आयोजक चांदाेरकर प्रतिष्ठानतर्फे कळवण्यात आले आहे. २ वर्षांच्या खंडानंतर साजरी होणारी पाडवा पहाट ही मैफल रसिकांनी चुकवू नये अशी आहे. हा कार्यक्रम शासकीय नियमांच्या अधीन राहून आयोजित करण्यात येणार असल्यामुळे रसिकांना मास्क अनिवार्य असतील व खुर्चीवर बसण्याआधी आपले हात सॅनिटायझरने स्वच्छ करण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.