⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

जळगावातील दर्ग्यावर पाकिस्तानचा झेंडा ? वाचा काय आहे प्रकरण

जळगाव लाईव्ह न्यूज | २० जानेवारी २०२३ | जळगाव एमआयडीसी हद्दीतील विटनेर गावानिकट असलेल्या एका दर्ग्यावर पाकिस्तानचा झेंडा लावला आहे. अश्या प्रकारची माहिती गावाचे पोलीस पाटील यांनी मिळाली होती. पर्यायी तो झेंडा घटनास्थळ गाठून काढून घेण्यात आला आणि दर्ग्यावरील एका व्यक्तीला पोलिसांच्या स्वाधीन केलं. मात्र हा हा पाकिस्तानचा झेंडा नसल्याचे चौकशीत समोर आले आहे याच बरोबर पुढे जाऊन झेंड्यामुळे पुन्हा अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून हा झेंडा जप्त करण्यात आला.

अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कारवाई

विटनेर गावात पाकिस्तानी झेंडा, असं सांगून सोशल मीडियात काही पोस्ट व्हायरल होत आहेत. व्हिडिओ व्हायरल होत आहेत. हे सत्य नाहीए. तो फक्त हिरवा आणि पांढऱ्या रंगाचा झेंडा आहे. तो पाकिस्तानचा झेंडा नाहीए. त्यामुळे कुणीही अशा पोस्ट व्हायरल करू नये. आणि अफवा पसरवू नये. अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलीस निरीक्षक हिरे यांनी दिला आहे.

वाचा काय आहे प्रकरण
तर झाले असे कि, झेंड्यावरील वादावरून संबंधितावर गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. मात्र, हा पाकिस्तानचा झेंडा नसल्याचे चौकशीत समोर आले. आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी ग्रामस्थांची समजूत घातली. तसेच या आहे. तर ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला समज देण्यात आली आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विटनेर नावाचे गाव आहे. या गावाच्या जवळच एक दर्गा आहे. पाकिस्तानच्या झेंड्यासारखा दिसणारा झेंडा फडकत असल्याची माहिती देण्यात आली होती. या प्रकरणी तपास करण्यात आला. गोपाळ सुपडू कहार नावाच्या एका हिंदू व्यक्तीने जो नेरी जामनेर इथला राहणारा आहे त्याने तो लावला होता, असं समजलं. त्यानंतर गोपाळ कहार याला आणून त्याची चौकशी करण्यात आली. बाबा स्वप्नात आले आणि म्हणून मी तो झेंडा लावला. पण तो पाकिस्तानचा झेंडा आहे किंवा तसा दिसणारा झेंडा आहे याची आपल्याला माहिती नाही, असं गोपाळ कहार यानं चौकशीत सांगितलं. त्यानंतरही आम्ही त्याची सखोल चौकशी करत आहोत. पण त्या झेंड्याचं प्रत्यक्षात स्वरुप पाहिलं असता त्या झेंड्याला सफेद किनार आहे. अशी कुठलीही सफेद किनार पाकिस्तानच्या झेंड्याला नाही. त्यामुळे तो पाकिस्तानचा झेंडा आहे, असं म्हणता येणार नाही. पण तसाच दिसणारा हा झेंडा आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दिली.