⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

एक्सपोर्ट कॉनक्लेव्हचे आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२२ । उद्योग संचालनालया मार्फत “Conclave on Investment Promotion, Ease of Doing, Export & One District Product ही कार्यशाळा 29 सप्टेंबर ते 30 ऑक्टोंबर या कालावधीत जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली आयोजित केलेली आहे. जिल्ह्यातील निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नव उद्योजक, औद्योगिक संघटना, औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती, निर्यातदार व प्रगतीशील शेतकरी, शेतकरी सह संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, राज्य शासनाचे अधिकारी, निर्यात प्रचलन समितीचे सदस्य, निर्यात विषयक कामकाज करणारे सर्व घटक, व्यापारी बँका यांना आमंत्रित केलेले आहे.


या कार्यशाळेत निर्यात वृद्धी, उद्योग विषयक गुंतवणूक वृद्धी, एक जिल्हा एक उत्पादन व व्यवसाय सुलभीकरण बाबत विविध तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. तसेच निर्यातक्षम उत्पादनांचे (वस्तुंचे) प्रदर्शनही 29 व 30 सप्टेंबर रोजी सकाळी 10.00 ते 5.00 पर्यंत हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज, एमआयडीसी पोलिस स्टेशन जवळ आयोजित करण्यात आलेले आहे.
त्या अनुषंगाने जास्तीत जास्त उद्योजकांनी सदर कार्यक्रमास भेट देऊन मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.