⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

धोक्याची घंटा : हतनूरचे ४१ दरवाजे उघडले, तापीला पूर

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२१ । मागील काही दिवसापासून विदर्भात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पूर्णा नदीला मोठा पूर आला असून यामुळे हतनूर धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे आज शुक्रवारी सकाळी ६ वाजता धरणाचे ४१ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहे.

यामुळे दर सेकंदाला धरणातून १ लाख ३० हजार ६६५ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तरी हतनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी सावधानता बाळगावी. असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यासाठी सिंचन व बिगर सिंचनासाठी महत्त्वाचे असलेल्या हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला. विदर्भात देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे हतनूर धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने काल गुरुवारी रात्रीच धरणाचे ४१ दरवाजे उघडण्यात आले होत. आज सकाळी देखील धरणाचे ४१ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत.  दर सेकंदाला धरणातून १ लाख ३० हजार ६६५ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

परिणामी, तापी नदी दुथडी भरून वाहत असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, तापी नदीकाठी न जाण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.