⁠ 
रविवार, मे 19, 2024

कौशल्यातून रोजगाराकडे ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे उद्या आयोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२१ । राज्यातील युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

कौशल्यातून रोजगाराकडे (दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन व शेळीपालन) या विषयावर शुक्रवार 16 जुलै 2021 रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत मार्गदर्शन सत्र होणार आहे. या मार्गदर्शन सत्रास नंदूरबार कृषि विज्ञान केंद्राचे संचालक राजेंद्र दहातोंडे हे दुपारी 3 ते 3.30 वाजता, डॉ. धनराज चौधरी, शास्त्रज्ञ, पशुसंवर्धन व दुग्ध शास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, धुळे हे दुपारी 3.30 ते 4  या वेळेत तर बाबासाहेब सोळांकूर पाटील (महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे) कृषी पर्यटन तज्ञ हे दुपारी 4 ते 4.30 या वेळेत मार्गदर्शन करणार असून दुपारी 4.30 ते 5 या वेळेत प्रश्नोत्तरे घेण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींनी खालील लिंकव्दारे सहभागी होऊन या मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ राजपाल, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

फेसबुक – https://www.facebook.com/MaharashtraSDEED

युट्युब – https://www.youtube.com/channel/UC7o2gQB5q7VaITABN4FHw1A