ONGC मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; तब्बल १२ लाखांचे पॅकेज मिळणार, पात्रता काय?

मार्च 10, 2026 1:23 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । देशातील आघाडीची ऊर्जा कंपनी, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) ने गोवा येथील त्यांच्या प्रगत प्रशिक्षण संस्थेत (ATI) विविध प्रमुख पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ओएनजीसीमध्ये नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.

ongc

या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु असून इच्छुक उमेदवार २३ मार्च २०२६ पर्यंत अर्ज करू शकतात. या वेळेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग, इंटरव्ह्यू आणि कागदपत्र पडताळणीद्वारे केली जाणार आहे. तुम्हाला ongcindia.com वर जाऊन रजिस्ट्रेशन करुन फॉर्म फिरायचा आहे.

या पदांसाठी होणार भरती

ओएनजीसीमधील ट्रेनिंग सेंटरसाठी हेड (कॅटरिंग), हेड (हाउसकिपिंग), हेड (कंसीर्ज) या पदासांठी भरती होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने हॉटेल किंवा हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमध्ये डिग्री प्राप्त केलेली असावी. तसेच या क्षेत्रात ७ वर्षांचा कामाचा अनुभव असायला हवा. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने याआधी २ स्टार, ३ स्टार हॉटेलमध्ये काम केलेले असावे.

हेड (हॉर्टिकल्चर) पदासाठी हॉर्टिकल्चर, अॅग्रीकल्चर किंवा फ्लोरीकल्चरमध्ये डिप्लोमा केलेला असावा. यासाठी ७ वर्षांचा अनुभव असावा. हेड (ट्रेनिंग अँड डायविंग) पदासाठी भारतीय नौसेनेतून डायवर ट्रेड सर्टिफिकेट किंवा PADI प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे. उमेदवारांकडे अनुभव असायला हवा.

१२ लाखांचे पॅकेज मिळणार

कॅटरिंग हेड, हाउसकिपिंग हेड, हॉर्टिकल्चर हेड या पदांसाठी निवड झाल्यावर १२ लाखांचे पॅकेज मिळणार आहे. हेड (कंसीयर्ज अँड ओवरऑल एक्सपीरियंस) पदासाठी १० लाखांचे पॅकेज मिळणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now