‘ई-पास’साठी एकाच दिवसात हजारावर अर्ज : कागदपत्रे नसल्यास परवानगी रद्द

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यांतर्गत प्रवास करण्यासाठी शासनाने ई-पास बंधनकारक केला असून त्यासाठी शासनाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. 

कालपासून संकेतस्थळ सुरू झाल्यापासून एकाच दिवसात तब्बल १ हजारावर नागरिकांनी नोंदणी केली आहे. दरम्यान, नागरिकांनी योग्य कागदपत्रे न जोडल्यास अर्ज रद्द केला जाणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या निर्बंधात अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. जिल्ह्यांतर्गत प्रवास किंवा जिल्ह्याबाहेर प्रवास करण्यासाठी देखील ई-पास घेणे आवश्यक आहे. अंत्यविधी, लग्न सोहळा (कुटुंबातील नातेवाईक), वैद्यकीय कारणांसाठीच परवानगी दिली जात आहे. एका दिवसात तब्बल हजारावर अर्ज आलेले आहेत.