जळगावात पुन्हा अपघात; चार बहिणींच्या एकुलत्या एक भावाचा मृत्यू

ऑगस्ट 3, 2025 10:07 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑगस्ट २०२५ । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना सातत्याने घडताना दिसत असून यात अनेकांना जीवावर मुकावे लागत आहे. अशातच आखणी एका अपघाताची घटना समोर आलीय. ज्यात मासे घेण्यासाठी जात असलेल्या तरुणाच्या दुचाकीला भरधाव काँक्रीट मिक्सरने धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुण ठार झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील उमाळा गावाजवळ घडली.साहिल मोहम्मद खाटीक (वय २३, रा. बिलाल चौक, तांबापुरा, जळगाव) असं मयत तरुणाचे असून याबाबत एमआयडीसी पोलिसांनी वाहन ताब्यात घेतलं आहे.

sjjd

साहिल खाटीक हा तरुण त्याच्या वडिलांसह महामार्गालगत मासे विक्रीचे दुकान लावत होता. शनिवारी नेरी (ता. जामनेर) येथे दुचाकी(एमएच १९, ईक्यू ३१३२) ने जात होता. त्यावेळी उमाळा गावाजवळ भरधाव काँक्रीट मिक्सर वाहनाने (क्र. एमएच १५, जीव्ही ५६३०) दुचाकीला धडक दिली.

अपघातात दुचाकीचा अक्षरशः चुराडा होऊन साहिल जागीच ठार झाला. घटनेची माहिती समजताच एमआयडीसी पोलिस घटनास्थळी पोहचले व ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला. त्याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर कुटुंबीयांनी केलेला आक्रोश मन हेलावणारा होता.त्याच्या पश्चात आई-वडील, चार बहिणी असा परिवार आहे. चार बहिणींचा तो एकुलता एक भाऊ होता.या घटनेमुळे तांबापुरा परिसरात शोककळा पसरली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now