सावदा येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या

ऑक्टोबर 9, 2021 9:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२१ । सावदा शहरातील देवकरवाडा भागात भाड्याने राहणाऱ्या एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली. भूषण दत्तात्रय महाजन ( वय ४३, मूळ रा. खिर्ची ता. रावेर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव असून या प्रकरणी सावदा पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

New Project 1 1 jpg webp

याबाबत असे की, मूळ रावेर तालुक्यातील खिर्डी येथील भूषण महाजन हे सावदा येथील देवकरवाडा येथील कुरकुरे यांच्या घरात भाड्याने राहता होता. त्याने दि. ९ रोजी सकाळी ८ ते दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान भाड्याच्या घरात किचनमध्ये छतास असलेल्या लोखंडी हुकाला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. हर्षल प्रकाश इंगळे (रा. खंडेराववाडी, फैजपूर ता. यावल) याच्या खबरीनुसार सावदा पोलिसात  मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली हेपोकॉ उमेश पाटील  हे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now