धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू

ऑगस्ट 10, 2023 1:00 PM

जळगाव लाईव्ह न्यूज| १० ऑगस्ट २०२३। जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरात राहणाऱ्या वृध्दाचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विनोद नामदेव वराडे (वय-६७) रा. सिध्दीविनायक मंदीराजवळ, शिवकॉलनी, जळगाव असे मयत वृध्दाचे नाव आहे.

DEATH jpg webp

माहितीनुसार, विनोद वराडे हे वृध्द व्यक्ती आपल्या पत्नी व मुलीसह शिवकॉलनीतील सिध्दीविनायक मंदीराजवळ वास्तव्याला होते. गुरूवारी १० ऑगस्ट रोजी घरात कुणाला काहीही न सांगता सकाळी ५ वाजता घरातून निघून गेले. त्यानंतर खंडेराव नगरजवळील रेल्वे रूळावरील खंबा क्रमांक ४१७ जवळून जात असतांना धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास उघडकीला आली. रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हर्षल पाटील आणि अजय सपकाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. मयताच्या पश्चात पत्नी सुनिता तसेच सुरेखा आणि मनिषा या दोन मुली असा परिवार आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now