तेलाचा टँकर पलटी झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली अन्.. भुसावळातील प्रकार

जून 17, 2023 3:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२३ । भुसावळ शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील खुशबू हॉटेलसमोर एक अपघात झालाय. एका चारचाकी वाहनाला वाचवण्याच्या नादात कच्चे खाद्यतेल घेऊन जाणारा टँकर उलटल्याची घटना घडली. तेलाचा टँकर पलटी झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. ही बातमी कळताच परिसरातील लोक धावत सुटले. अनेकांनी तेल घेऊन जाण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

bhusawl oil tank jpg webp

नेमकी काय आहे घटना?
सोयाबीनचे तेल घेऊन जाणारा टँकर गुजरातमधील अंजिराकडे जात होता. यादरम्यान भुसावळ शहरातील खुशबू हॉटेलसमोर राष्ट्रीय महामार्गावर एका कारला वाचवण्याच्या प्रयत्नात टँकर उलटला. या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र तेलाचा टँकर उलटल्याची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली.

त्यानंतर शहरातील फेकरी आणि इतर आजूबाजूच्या नागरिकांनी तेल भरण्यासाठी एकच गर्दी केली. कोण डबे घेऊन आले, तर कोण पातेलं घेऊन आले, जे हाती मिळेल ते साहित्य घेऊन लोकांनी तेल पळवण्यासाठी गर्दी केली. शिवाय हे तेल रिफायनरीमध्ये जात असल्याने अशुद्ध आणि कच्चे तेल आहे, हे माहित असतानाही नागरिकांनी भरुन नेले.

काहींनी या घटनेचा व्हिडिओ बनवला असून तो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे.मात्र नागरिकांनी तेल वाहून नेण्यासाठी गर्दी केल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. नागरिकांनी एकच झुंबड केल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now