जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही पदवी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक गुडन्यूज आहे. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (OICL) ने सहाय्यक (वर्ग III) पदासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे तब्बल ५०० रिक्त जागा भरल्या जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रात ६४ जागा रिक्त आहेत. OICL Bharti 2025

या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवार orientalinsurance.org.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच २ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट २०२५ निश्चित करण्यात आली आहे.

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता :
अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी भारतातील मान्यताप्राप्त संस्थेतून कोणत्याही शाखेत पदवी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवारांनी इयत्ता १०वी, १२वी किंवा पदवीमध्ये इंग्रजी विषयाचा अभ्यास केलेला असावा.
वयोमर्यादा
३१ जुलै २०२५ रोजी सहाय्यक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय २१ वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय, विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयातही सूट दिली जाईल. अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षे, ओबीसी उमेदवारांना वयोमर्यादेत ३ वर्षे आणि दिव्यांग उमेदवारांना वयोमर्यादेत १० वर्षे सूट दिली जाईल.
अर्ज शुल्क :
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना परीक्षा शुल्क देखील भरावे लागेल. अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १०० रुपये आहे आणि इतर श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ८५० रुपये आहे.
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा पगार २२,४०५/- ते ६२,२६५/- इतका मिळेल
| भरतीची सविस्तर जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |












