⁠ 
सोमवार, डिसेंबर 2, 2024
Home | बातम्या | महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी कधी? समोर आली तारीख..

महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी कधी? समोर आली तारीख..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२४ । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. महायुतीने तब्बल २३० जागांवर यश मिळविले आहे. राज्यात महायुतीचेच सरकार येणार असल्याच हे निश्चित झाले आहे. महायुतीकडून मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे बोललं जात आहे. सोबतच भाजपचे १० आमदार, शिवसेना शिंदे गट 6, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची चर्चाही रंगली आहे. त्यातच आता नव्या सरकारचा शपथविधी कधी पार पडणार याची तारीख समोर आली आहे.

भाजप नेते रावसाहेब दानवे यांना महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी कधी पार पडणार याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तसेच मुख्यमंत्री कोणाचा होणार, यावरही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले.

येत्या ३० तारखेला नव्या सरकारचा शपथविधी पार पडेल. भाजपसह इतर पक्षांचे नेते कार्यकर्ते यांना त्यांचा मुख्यमंत्री व्हावा, असे वाटत आहे. आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री का होऊ नये अशी प्रत्येक पक्षाची ही भावना असते. त्यामुळे सर्वजण मागणी करत आहेत. एकनाथ शिंदे हे महायुतीत नाराज नाहीत. या फक्त चर्चा आहेत. तसेच मुख्यमंत्रि‍पदाचा आणि मंत्रि‍पदाचे फॉर्म्युला एकत्रित बसून ठरवला जाईल, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले.

दरम्यान महायुतीकडून लवकरच सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह दिल्लीत बैठकांवर बैठका पार पडताना दिसत आहेत. त्यातच आता नवीन सरकार कधी शपथ घेणार, मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी माहिती समोर आले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांसोबत 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, असेही बोललं जात आहे. यात भाजपचे १० आमदार, शिवसेना शिंदे गट 6, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.