जळगाव जिल्हाजळगाव शहरमहाराष्ट्रराजकारण

उत्तर महाराष्ट्राला आजवर कधीही मुख्यमंत्री पद मिळालं नाही : असं का म्हणाले अजित पवार?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज । २६ डिसेंबर २०२२ । उत्तर महाराष्ट्राला आजवर कधीही मुख्यमंत्री पद मिळालं नाही असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केले. यावेळी त्यांनी विदर्भातील सर्व नेत्यांना चांगलीच समज दिली.

यावेळी ते म्हणाले कि,उत्तर महाराष्ट्राला आजवर कधीही मुख्यमंत्री पद मिळालं नाही अशी खदखद विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विधानसभेत मांडली. बोलत असताना त्यांनी विदर्भाचा उल्लेख करताना विदर्भाला इतकी पद मिळाली तरी देखील विदर्भाचा विकास झाला नाही असा खोचक टोलाही लगावला. यामुळे इथल्या लोकांनी एकत्र येऊन आता विदर्भाचा विकास करायला हवं असं अजितदादा पवार म्हणाले.

याचबरोबर मुख्यमंत्री पदाचे उमेदवार गिरीश महाजन असतील असे सभागृहात कोणीतरी म्हणाल. त्याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, गिरीश महाजन यांचे कॉन्टॅक्ट खूप आहेत त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय जनता पक्ष वाढवण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. यामुळे मुख्यमंत्री पदाचा माहीत नाही मात्र त्यांना युनायटेड नेशन्स मध्ये नक्की भारतीय जनता पक्ष वाढवण्याची जबाबदारी देण्यात येईल असे अजित पवार म्हणाले.

याचबरोबर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा करायची योजना वजा इच्छा होती असेही अजित पवार म्हणाले. मात्र विदर्भाचा विकास करायचा असेल तर सगळ्यांना एकत्र येण्याची गरज आहे.

Related Articles

Back to top button