निर्माल्य संकलन मोहीम : जीवरक्षक पथक सज्ज, ६० स्वयंसेवकांचा सहभाग!
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२२ । मनपा तर्फे निर्माल्य संकलन मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत असून सामाजिक संघटनांनी देखील निर्माल्य संकलनासाठी पुढाकार घेतला आहे मनपा अग्निशमन विभागाचे जीवरक्षक मेहरून तलाव येथे तैनात आहेत त्याच बरोबर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव आणि वन्यजीव संरक्षण संस्था जळगांव यांच्या सैयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या निर्देशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील , तहसीलदार नामदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिह रावळ यांच्या निगराणीत मेहरून तलाव येथे जीवरक्षक बोटी सह 20 जीवरक्षकांचे पथक सकाळी 9 वाजे पासून तैनात राहणार आहे. या पथकात पट्टीच्या पोहणाऱ्या प्रशिक्षित जीवरक्षकांचा समावेश राहणार असून विसर्जन स्थळी 10 सर्पमित्र , प्रथमोपचार तज्ज्ञ, आणि निर्माल्य संकलनासाठी 30 स्वयंसेवक असे एकूण 60 कार्यकर्ते सेवा देण्यास सज्ज झाले आहेत असे संस्था सचिव योगेश गालफाडे यांनी कळविले आहे. सर्पमित्र आणि जीवरक्षक पथक रात्री उशिरापर्यंत सेवा देणार आहेत. तर अमन गुजर हे ड्रोन द्वारे परिसरात होणाऱ्या घटनांवर नजर ठेवणार आहेत
यांचा राहील समावेश
जीवरक्षक पथकात – बाळकृष्ण देवरे, योगेश गालफाडे, सतीश कांबळे, अजीम काजी, निलेश ढाके, स्कायलेब डिसुझा, राजेश सोनवणे, जगदीश बैरागी, ऋषी राजपूत, अमन गुजर, अरुण सपकाळे, चेतन भावसार, कृष्णा दुर्गे, हेमराज सपकाळे, दिनेश सपकाळे, रितेश भोई, रवींद्र भोई, राहुल सोनवणे, प्रसाद सोनवणे, गणेश सोनवणे, मयूर वाघूलदे, बापू कोळी, श्याम पाटील, प्रदीप शेळके, विनोद सोनवणे, यांचा समावेश राहील.
निर्माल्य संकलनासाठी राहुल सोनवणे यांच्या नेतृत्वात युवराज क्लासेस चे विद्यार्थी तसेच रवींद्र फालक, रवींद्र सोनवणे, बाळकृष्ण देवरे, वासुदेव वाढे, छाया ढोले, तुषार रंध्ये, भरत शिरसाठ, मुकेश सोनार , विजय रायपुरे, भूषण चौधरी, जितेंद्र सोनवणे, अमोल देशमुख, गौरव शिंपि हे पथक निर्माल्य संकलन करणार आहेत. मेहरुण तलाव , मन्यारखेडा तलाव, गिरणा काठ या भागात वन्यजीव संरक्षण संस्थेचे कार्यकर्ते सेवा देणार आहेत असे संस्था अध्यक्ष रवींद्र फालक, बाळकृष्ण देवरे यांनी सांगितले.