⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 9, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगाव रेल्वे स्टेशनजवळ होणार ‘नो हॉकर्स’ झोन !

जळगाव रेल्वे स्टेशनजवळ होणार ‘नो हॉकर्स’ झोन !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२३ ।  अमृत २.०चा प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीचा प्रस्ताव पुन्हा महासभेत सादर करण्यात आला आहे. गेल्या तीन महिन्यापुर्वी महासभेने अमृत २.० चा प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याचा ठराव केला होता. परंतु मुंबई येथील शहा टेक्नीकल कन्स्ल्टंट मुंबई यांनी असमर्थतता दर्शविल्यामुळे आता पुन्हा सल्लागार नियुक्तीचा प्रस्ताव महासभेपुढे मांडण्यात आला आहे.

दि.७ जुलै शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. या महासभेत एकुण ६६ विषय मंजुरीसाठी सादर करण्यात आलेले आहेत. यामध्ये अमृत २.० अंतर्गंत होणाऱ्या कामांसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीचा देखील प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून अमृत २.०चा डीपीआर तयार करण्याचा विषय रखडला असून अमृत टप्पा दोनला अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.

शासनाने अमृत योजनेसाठी नियुक्त केलेल्या पॅनलवरील तीन एजन्सींना महापालिकेने बोलाविले होते. तसेच त्यांचे दर जाणून घेतले होते. त्यानंतर दि.२१ मार्च २०२३ रोजी कमी दर असलेल्या मुंबई येथील शहा टेक्नीकल कन्स्ल्टंट मुंबई यांना काम देण्याचा ठराव महासभेत करण्यात आला होता. परंतु त्या एजन्सीने काम करण्यासाठी असमर्थतता दर्शविल्यामुळे दुसऱ्या एजन्सीला काम देण्याची वेळ आली असून त्यासाठी दि.७ रोजी होणाऱ्या महासभेत पुन्हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

याच सोबत रेल्वे स्टेशन जवळील अतिक्रमण हटविण्यात येवून तेथे नो हॉकर्स झोन जाहीर करण्याचा देखील प्रस्ताव सादर करण्यात आला असून मनपा सभागृह नुतणीकरण करणे, एमआयडीसीमधील अग्निशमन केंद्र अद्यावत करणे व नवीन वाहने खरेदी करणे, शहरात हायमस्ट लॅम्प लावण्यासाठी ना हरकत देणे, रस्त्यांसाठी ना हरकत देणे, रामानंद नगर पोलिस स्टेशला जागा देणे, अतिक्रमण विभागाने जप्त केलेल्या साहित्याला नवीन दंड आकरणे, मनपाच्या मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी एजन्सी नियुक्त करणे अशा विविध विषयांचे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह