मुलगा घरात झोपलेला असताना पित्याने घेतला गळफास

सप्टेंबर 14, 2021 11:02 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२१ । मुकबधीर मुलगा घरात झोपलेला असताना पित्याने साडीने छताला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना जळगाव शहरातील समतानगरात घडली. हेमराज रमेश शिंदे (वय ३५) असे मृताचे नाव असून या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली अाहे.

crime jpg webp

याबाबत असे की, हेमराज शिंदे हे ट्रॅक्टर चालक होते. रविवारी सकाळी पत्नी मुलीसोबत काही कामानिमित्त बाहेर गेलेली असताना हेमराजने पत्नीच्या साडीच्या सहाय्याने छताला गळफास लावून आत्महत्या केली. हेमराजने अात्महत्या केली तेव्हा त्याचा मुकबधीर मुलगा घरात झोपलेला होता.

पत्नी व मुलगी घरी परतल्यानंतर सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. हेमराजने घराच्या दरवाजाची कडी आतून लावलेली होती. पत्नीने दरवाजा जोरात ढकलल्यानंतर पतीचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह बघून आक्रोश केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली अाहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now