---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे

मोठी बातमी! दहा हजाराची लाच स्वीकारताना निंभोरा पोलीस स्टेशनचा पीएसआय जाळ्यात

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | 12 जून 2024 | लाचखोरीची एक मोठी बातमी समोर आली आहे. पोलीस स्टेशनला जप्त असलेले वाहन सोडण्यासाठी तक्रारदाराकडून तडजोडीअंती १० हजार रुपयाची लाच स्वीकारताना निंभोरा पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षकाला जळगाव एसीबीने रंगेहात अटक केली. कैलास ठाकूर असे लाचखोर पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून या कारवाई पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

lach jpg webp webp

कैलास ठाकूर हे निंभोरा पोलीस स्टेशनला पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्त होते. सुमारे चार महिन्यांपूर्वी एका वाहनावर गुटख्याची कारवाई करण्यात आली होती. त्यातील वाहन जप्त करण्यात आले होते. हे वाहन सोडविण्यासाठी तक्रारदाराने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने तक्रारदाराला वाहन देण्याबाबत आदेशित केले होते.

---Advertisement---

मात्र निंभोरा पोलीस स्टेशनचे पीएसआय कैलास ठाकूर यांनी हे वाहन सोडविण्यासाठी १५ हजारांची लाच मागितली. तक्रारदाराने अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगावला संपर्क करून तक्रार दिली. त्यानंतर सापळा रचण्यात आला. निंभोरा गावात मरीमाता मंदिराजवळ पीएसआय ठाकूर यांना तक्रारदार यांच्याकडून १० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---