जळगाव लाईव्ह न्यूज । दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटात किमान १२ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली असून दहशतीचं वातवरण निर्माण झालं आहे. दरम्यान या बॉम्बस्फोटाचे नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यात या शक्तिशाली स्फोटामुळे झालेले मोठे नुकसान स्पष्टपणे दिसून आले आहे.

हा व्हिडिओ स्फोटस्थळाच्या सर्वात जवळचा असल्याचं म्हटलं जात आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रस्त्यावर लोकांची वर्दळ असताना अचानक ब्लास्ट होतो. आजूबाजूला रिक्षा, कार, दुचाकी उभ्या होत्या पण एका ब्लॉस्टमुळे सर्वकाही नष्ट झाली. स्फोटामुळे परिसरात धुराचे लोट पसरतात. सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील काही क्षणासाठी सर्वकाही धुसर दिसू लागतं. तर काही वेळानंतर लोकं इकडे – तिकडे पळताना दिसत आहेत. व्हिडीमध्ये दिसत आहे की, ब्लॉस्ट किती भयानक होता..

दरम्यान, हा आत्मघातकी हल्ला असल्याचे वर्णन डॉ. उमर मोहम्मद याने केलं होतं, जो पेशाने डॉक्टर असून आणि फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित होता. याप्रकरणी सध्या पोलीस कसून चौकशी करत असून, महत्त्वाच्या ठिकाणी अर्लट जारी करण्यात आला आहे.











