‘या’ बँकेत 600 हून अधिक पदांची भरती, पदवी पाससाठी नोकरीचा चान्स

जून 8, 2022 3:54 PM

नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक, NESFB ने भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट nesfb.com वर जाऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया 7 जून 2022 पासून सुरू झाली असून 14 जून 2022 पर्यंत उमेदवार त्यासाठी अर्ज करू शकतील.

NESFB Recruitment 2022 1 jpg webp

रिक्त पदांचा तपशील :

एकूण 625 पदांची भरती करण्यात आली आहे. ज्यामध्ये शाखा प्रमुखाची 80 पदे, सहायक शाखा प्रमुखासाठी 130, सिंगल विंडो ऑपरेटरसाठी 50, व्यवसाय विकास कार्यकारी पदासाठी 340, झोनल हेडसाठी 10 आणि क्लस्टर बिझनेस मॅनेजरसाठी 15 पदे आहेत.

शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण झालेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. तपशीलवार शैक्षणिक पात्रता भरती अधिसूचनेमध्ये पाहिली जाऊ शकते.

वय श्रेणी
कमाल 27 वर्षांपर्यंतचे उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

नोकरी ठिकाण : ईशान्येकडील राज्ये

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now