⁠ 
रविवार, सप्टेंबर 29, 2024
Home | बातम्या | केंद्रिय मंत्रीपदासाठी राष्ट्रवादीचे प्रफुल पटेलांच्या नावावर शिक्कामोर्तब…

केंद्रिय मंत्रीपदासाठी राष्ट्रवादीचे प्रफुल पटेलांच्या नावावर शिक्कामोर्तब…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२४ । लोकसभा निवडणुक २०२४ च्या  निवडणुकांमध्ये बहुमतांनी एनडीएचा विजय झाल्यानंतर नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. हा शपथविधी उद्या (रविवारी) ९ जून रोजी पार पडणार आहे. यासोबतच उद्याच्या शपथविधी सोहळ्यात राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल देखील कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची स्पष्ट झाले आहे.

हा सोहळा उद्या दिल्ली येथे पार पडणार असून, यामध्ये राज्यामधील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या वाट्याला प्रत्येकी एक एक मंत्रीपद आले आहे. तरी यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केंद्रीय मंत्री पदासाठी प्रफुल पटेल यांच्या नावावर शिक्कमोर्तब करण्यात आला आहे. निवडणुकांमध्ये बघून मतांनी निवडून आल्यानंतर दिल्लीमध्ये अनेक बड्या नेत्यांबरोबर बैठकांचे सत्र सुरूच आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्ली येथे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठकी पार पडल्या, या बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर राष्ट्रवादी पक्षाकडून शिक्कमोर्तब करण्यात आला आहे.

उद्याच्या शपथविधी प्रफुल पटेल देखील कॅबिनेटरच्या मंत्रिपदाची शपथ घेतील अशी माहिती समोर आली आहे त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाकडून देखील एक नेता मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अनेक नेत्यांची नावे देखील मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून खासदार धैर्यशिल माने, श्रीरंग बारणे, प्रतापराव जाधव, तर भाजपकडून नारायण राणे, रक्षा खडसे, यांची नावे मंत्री पदासाठी चर्चेत आहेत. त्यामुळे यापैकी केंद्रात कुणाची वर्णी लागणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

author avatar
Manasi Patil