जळगाव लाईव्ह न्युज | ११ मे २०२२ | जळगाव शहरातील नागरिकांना एक महिन्यापासुन महानगरपालिकेकडून दूषित पाणीपुरवठा केला जात आहे . त्यामुळे नागरिकांना पिवळसर रंगाचे , शेवाळयुक्त व दुर्गंधीयुक्त पाणी मिळत आहे . यामुळे जळगाव शहरात रोगराईचे प्रमाण वाढलेले असुन पाण्याशी संबंधित ईतरही आजार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासंदर्भात नागरिकांनि वेळेवेळी तक्रारी करूनही महानगरपालिका प्रशासन दखल घेत नाही. उलट चुकीची माहिती देण्यास अग्रक्रम देत आहे . मेहरुण परिसरातील सुप्रीम कॉलनी तांबापुरा व शहरातील अनेक भागांमध्ये दूषित व गढुळ दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. तरी या समस्येवर लवकरात लवकर उपाय करून नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर तर्फे महानगरपालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.
आयुक्तांशी झालेल्या चर्चेदरम्यान शिष्टमंडळाने शहरातील काही भागांमध्ये रात्री 2 , 3 वाजता अवेळी होणाऱ्या पाणीपुरवठा बाबत देखील बदल करण्यात यावा व भविष्यात वॉटर मिटर बसविण्यात येऊ नये याविषयी देखील विनंती केली . आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी निवेदकांशी झालेली चर्चा सकारात्मक घेत पाणीपुरवठा अभियंता गोपाळ लुले यांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याबाबत योग्य उपाययोजना करण्याबाबत सूचना केली
निवेदन देतांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी , सुनील माळी , राजू मोरे , युवक महानगर अध्यक्ष रिकू चौधरी , अमोल कोल्हे , रिजवान खाटिक , विशाल देशमुख , रहीम तडवी , अकिल पटेल , अशोक सोनवणे , संजय जाधव , जितेंद्र बागरे , हितेश जावळे , गौतम गवळे , योगेश लाडवंजारी आदि उपस्थित होते .