जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२४ । रावेर लोकसभेची जागा महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटली असून राष्ट्रवादीने भाजपमधून आलेल्या उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली. मात्र यावरून जिल्ह्यातील शरद पवार नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे.राष्ट्रवादीतील धुसफूस थोपविण्यासाठी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जळगावमध्ये आले होते. त्यानंतर आज दि २१ रोजी शरद पवार हेच जळगावमध्ये दाखल झाले आहेत.
शरद पवार यांचे जळगाव विमानतळावर रोहिणी खडसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. यावेळी पदाधिकाऱ्यांसोबत बंद द्वार बैठक झाल्याचं कळते. माजी खासदार ईश्वरलाल जैन हे सुद्धा शरद पवार यांची भेट घेण्यासाठी जळगाव विमानतळावर दाखल झाले होते. शरद पवार यांच्यासोबत सुरू असलेल्या बैठकीत रावेर लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटील हे पण उपस्थित आहे.
पदाधिकाऱ्यांसोबत शरद पवार यांची बंद वार चर्चा सुरू आहे. नेमकी काय चर्चा सुरू हे बाहेर येऊ शकलेलं नाही. मात्र कार्यकर्त्यांची नाराजी रावेर लोकसभेत निवडणुकी संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडींबाबत शरद पवार यांची पदाधिकाऱ्यांचे चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
नाराजी कशासाठी
रावेरमध्ये भाजपमधून आलेले श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्याने भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी व कार्यकर्त्यांची नाराजी समोर आली. ते या मतदार संघातून खासदारकीसाठी इच्छुक होते. त्यांनी तशी इच्छा पण व्यक्त केली होती. पण भाजपमधून आलेल्या श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने ते नाराज झाले. त्यांच्या समर्थकांनी सुद्धा हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला. जयंत पाटील यांनी काल शिष्टाईचा प्रयत्न केला होता. संतोष चौधरी यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यात आता शरद पवार हेच दाखल झाल्याने काय घडामोड घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. श्रीराम पाटील यांची उमेदवारी कायम राहते का, संतोष चौधरी यांची नाराजी दूर होणार का? या प्रश्नांची उत्तरे अवघ्या काही वेळातच मिळणार आहे.