⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | राष्ट्रवादी अजित पवार गटाचा शनिवारी विचार विनिमय तथा मार्गदर्शन मेळावा..!

राष्ट्रवादी अजित पवार गटाचा शनिवारी विचार विनिमय तथा मार्गदर्शन मेळावा..!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२४ । राष्ट्रवादी अजित पवार गट यांचा जळगाव व रावेर लोकसभा तथा विधानसभा मतदार संघातील सर्व पदाधिकारी यांचा “विचार विनिमय तथा मार्गदर्शन मेळावा”चे आयोजन करण्यात आले आहे. मिळाव्यात लोकसभा निवडणुकीबाबत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीचे पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट हे सक्रिय झाला आहे. लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवाराबाबत प्रचार व राजकीय रणनीती बाबत मार्गदर्शन व विचारविनिमय हे या मेळाव्यात केले जाणार आहे.प्रमुख मार्गदर्शक मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील उपस्थित असतील.कार्यक्रम शनिवार दि. 30 मार्च सकाळी 11:00 वाजता, लाड वंजारी मंगल कार्यालय, आकाशवाणी चौक येथे होणार आहे.

तरी जळगाव लोकसभा व रावेर लोकसभा मतदारसंघातील सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, युवक पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवती पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, जिल्ह्यातील सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष व जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संजय पवार (जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष), उमेश नेमाडे (रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष), अभिषेक पाटील यांनी केले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.