भुसावळात गावठी कट्ट्यासह नाशिकचा तरुण जेरबंद

एप्रिल 4, 2026 12:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहरात पोलिसांनी धडक कारवाई करत गावठी कट्ट्यासह फिरणाऱ्या नाशिकच्या एका तरुणाला जेरबंद केले आहे. श्रीराम नगर परिसरात दहशत पसरविण्याच्या उद्देशाने तो शस्त्र घेऊन आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ सापळा रचत ही कारवाई केली. संदीप सुनील जाधव (23, रा.कुमावत नगर, सहजयश अपार्टमेंट, मखमलाबाद रोड, पंचवटी, नाशिक) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्या ताब्यातून गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

sandipjadhav

भुसावळ बाजारपेठ पोलिसांना श्रीराम नगर परिसरात एक संशयित इसम गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने (2 एप्रिल) रात्री सुमारे पावणेअकराच्या सुमारास तातडीने कारवाई करत संशयिताला ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या संशयिताची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडून सुमारे 20 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा आणि एक हजार रुपये किंमतीचे जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करत आरोपीविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा अवैध शस्त्रांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून शहरात गस्त आणि तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now