फुले मार्केट मधील दुकानांचे लाईट चोरले; सीसीटीव्हीत कैद

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२२ । शहरातील फुले मार्केट मधील चार दुकानांच्या बाहेर सुरू असलेले लाईट चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री लांबविले खरे, पण ही चोरी करताना तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. रविवारी हा प्रकार उघडकीस आला. या प्रकणारी दुकानदारांनी शहर पोलिसात तक्रार दिली आहे.

शहरातील फुले मार्केटमध्ये अविनाश वर्मा यांचे मार्केटच्या तळमजल्यावर गाळा क्रमांक ८६ येथे दुकान आहे. या दुकानाच्या बाहेर सुरू असलेले दोन लाईट शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी चोरून नेले. रविवारी सकाळी प्रकार समोर आला. यावेळी शर्मा यांच्यासह मार्केटमधील प्रदीप मंडोरे यांचे दुकानाबाहेरील ४ लाईट, श्री फैशन या दुकानाचे ६ लाईट तर शिवा कॉस्मेटिक या दुकानाचा एक मोठा लाईट असे एकूण ११ लाईट चोरट्यांनी चोरून नेल्याचेही समोर आले.

दरम्यान शर्मा यांच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीचा प्रकार कैद झाला आहे. यात चार ते पाच तरुण येतांना, त्यानंतर लाईट काढून हातात घेऊन जातांना दिसून येत आहे.
हे देखील वाचा :
- संतापजनक ! अल्पवयीन मुलीवर नात्यातील नराधमाचा अत्याचार; पीडित मुलगी गर्भवती
- एरंडोलमधील ३ कुख्यात गुन्हेगार जळगाव जिल्ह्यातून तडीपार
- सालदाराकडून वृद्ध मालकिणीचा बेल्टने गळा आवळून खून ; रावेरातील घटनेने खळबळ
- तरसोद-पाळधी बायपासवर पुन्हा भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू
- मावशीच्या घरावरच भाच्याचा डल्ला! रावेरातील घरफोडीचा छडा; दोघे जेरबंद



