जळगाव लाईव्ह न्यूज । २० जानेवारी २०२४ । चोपड्यातुन तीन तोतया अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनी गुटखा विक्रेत्याला औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याने भासवून पाच लाखांची खंडणी मागितली. याबाबत दोघांना ताब्यात घेण्यात आले असून तिसरा संशयित पसार झाला आहे.
याबाबत असे की, चोपडा शहरात जयहिंद कॉलनी परीसरात तीन तोतया अधिकारी त्यांच्या ताब्यातील वाहन उभे करून संशयितरित्या फिरत असताना लक्षात आले. याची माहिती मिळताच घटनास्थळी प्रभारी पोलिस निरीक्षक संतोष चव्हाण व इतर पोलिसांचे पथक गेले असता त्यांना संशयित आरोपी संशयितरित्या तोतयारी करताना आढळले.
फिर्यादी जितेंद्र गोपाल महाजन (28, लोहियानगर) यांना तिघां संशयितांनी औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याने भासवले तसेच सोलापूर विभागात पोलिस कर्मचारी असलेला राहुल शिवाजी देवकाते (35, रा.साकटी रोड, पंढरपूर, जि.सोलापूर), विनायक सुरेश चवरे (35, रा.721, गोविंदपुरा सोलापूर रोड, गुर्जर वाडा, जि.सोलापूर), लक्ष्मण ताड (पूर्ण नाव गाव माहित नाही) अशा तीन आरोपींनी फिर्यादीकडून पाच लाखांची खंडणी मागण्यात आली.
संशयितयांनी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचे भासवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तोतयागिरी करून पाच लाख रुपयाच्या खंडणीची मागणी केली. म्हणून त्यांच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये कलम 170, 384, 419, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. तर आरोपी राहुल शिवाजी देवकाते व विनायक सुरेश चवरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. तपास चोपडा शहर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित सावळे हे करीत आहेत.
दरम्यान, संशयित आरोपींच्या ताब्यातील चारचाकी वाहन देखील जप्त केले आहे. दरम्यान, वाहनावरही आरोपींनी बनावट वाहन क्रमांक असलेली नंबर प्लेट लावली आहे.