नोकरी संधी

नागपूर महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी: 245 जागांसाठी भरती, पगार ‘इतका’ मिळेल?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । नागपूर महानगरपालिकेने (Nagpur Municipal Corporation) 245 रिक्त पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ही भरती नागपूर महानगरपालिकेच्या विविध विभागातील रिक्त जागा भरण्यासाठी असेल. या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. आणि हो अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2025 पर्यंतच असेल. त्यामुळे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. Nagpur Mahanagarpalika Bharti

ही पदे भरली जाणार? Nagpur Mahanagarpalika Recruitment 2025
1) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)- 36
2) कनिष्ठ अभियंता (विद्युत)- 03
3) नर्स परीचारीका -52
4) वृक्ष अधिकारी -04
5) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक -150

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य
पद क्र.2: विद्युत/इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य
पद क्र.3: स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा)
पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) GNM
पद क्र.5: (i) BSc (हॉर्टिकल्चर्स) ॲग्रीकल्चर/ बॉटनी फॉरेस्ट्री पदवी/ वनस्पति शास्त्रातील पदवी (ii) 05 वर्षे अनुभव

इतका पगार मिळेल :
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 38,600/- ते 1,22,800/-
कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 38,600/- ते 1,22,800/-
नर्स परीचारीका – 35,400/- ते 1,12,400/-
वृक्ष अधिकारी – 35,400/- ते 1,12,400/-
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक -25,500/- ते 81,100/-

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 जानेवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे असावे. तसेच भरतीसाठी अराखीव उमेदवारांना ₹1000/- रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल. तर मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹900/- रुपये.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button