जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. नागपूर महानगरपालिकेत विविध पदांसाठी मोठी पदभरती जाहीर करण्यात आलीय. विशेष या भरतीसाठी दहावी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. Nagpur Mahanagar Palika Recruitment 2025

या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया आज म्हणजेच २६ ऑगस्ट २०२५ पासून सुरु झाली आहे. तर या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर २०२५ आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. Nagpur Mahanagar Palika Bharti 2025

ही पदे भरली जाणार?
1) भरतीमध्ये ज्युनिअर क्लर्क – 60
2) लीगल असिस्टंट – 6
3) टॅक्स कलेक्टर – 74
4) लायब्ररी असिस्टंट – 8
5) स्टेनोग्राफर – 10
6) अकाउंटंट/कॅशियर – 10
7) सिस्टम Analyst – 1
8) हार्डवेअर इंजिनियर – 2
9) डेटा मॅनेजर – 1
10) प्रोग्रामर – 2
भरतीसाठी आवश्यक पात्रता काय?
ज्युनिअर क्लर्क : अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. ब) मराठी टंकलेखनाचे किमान ३० श.प्र. मि. व इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० श.प्र. मि. वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे. क) संगणक अर्हतेबाबत शासन वेळोवेळी निश्चित करण्याऱ्या धोरणानुसार आवश्यक पात्रता
लीगल असिस्टंट –: अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाची विधी शाखेची पदवी आणि ब) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील न्यायालयीन कामाशी संबंधीत पदावरील किमान ५ वर्षाची नियमित सेवा किंवा सत्र न्यायालयातील ५ वर्षे वकीलीचा अनुभव.
टॅक्स कलेक्टर – : अ) कोणत्याही शाखेची पदवी आणि ब) मराठी टंकलेखनाचे किमान ३० श.प्र. मि. व इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० श.प्र. मि. वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्या प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे. क) संगणक अर्हतेबाबत शासन वेळोवेळी निश्चित करणाऱ्या धोरणानुसार आवश्यक पात्रता.
लायब्ररी असिस्टंट -: अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा (S.S.C) उत्तीर्ण ब) ग्रंथालयाचा सर्टीफिकेट कोर्स
स्टेनोग्राफर -: मान्यताप्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी. अ) मराठी व इंग्रजी लघुलेखक ८० श.प्र.मि परिक्षा उत्तीर्ण. ब) संगणक अर्हतेबाबत शासन वेळोवेळी निश्चित करणाऱ्या धोरणानुसार आवश्यक पात्रता क) शासनाची मराठी ४० व इंग्रजी ६० श.प्र.मि. वेगाची टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण. ड) अनुभव: शासकीय/निमशासकीय कार्यालयातील स्टोनोटायपिस्ट पदाचा ३ वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
अकाउंटंट/कॅशियर – : अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाची वाणिज्य शाखेची पदवी. ब) भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील लोकल फायनान्स मॅनेजमेट (डी. एफ.एम) पदविका उत्तीर्ण अथवा L.G.S.D किंवा G.D.C & A परिक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.क) शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थाकडील लिपीक (लेखा) या पदावरील किमान ५ वर्षाची नियमित सेवा.
सिस्टम Analyst -: अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाची संगणक अभियांत्रिकीमधील AICTE द्वारा मान्यताप्राप्त पदवी (B.E Computer) अर्हता आणि ब) सिस्टीम अॅनॉलिसिस/प्रोग्रामिंग / सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मधील ३ वर्षाचा अनुभव. क) महानगरपालिकेमधील माहिती व तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यरत उपरोक्त नमूद अर्हता प्राप्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य असेल.
हार्डवेअर इंजिनियर -: अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाचा संगणक आभयात्रिकामधील AICTE द्वारा मा प्राप्त पदवी (B.E Computer) आणि संगणक देखभाल व दुरुस्तीचा ३ वर्षाचा अनुभव किंवा ब) मान्यताप्राप्त विद्यापिठाची Computer Hardware मधील पदविका आणि ५ वर्षाचा अनुभव. क) महापालिकेमधील माहिती व तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यरत उपरोक्त नमूद अर्हता प्राप्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य असेल.
डेटा मॅनेजर – : अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाची संगणक अभियांत्रिकीमधील AICTE द्वारा मान्यताप्रापत पदवी (B.E Computer) अर्हता आणि ब) सिस्टीम अॅनालिसिस/प्रोग्रामिंग / सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मधील ३ वर्षाचा अनुभव क) महापालिकेमधील माहिती व तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यरत उपरोक्त नमूद अर्हता प्राप्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य असेल.
प्रोग्रामर -: अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदविका (Diploma) अर्हता आणि ब) सिस्टीम अॅनलिसिस/प्रोग्रामिंग/सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मधील १ वर्षाचा अनुभव क) महापालिकेमधील माहिती व तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यरत उपरोक्त नमूद अर्हता प्राप्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य असेल
वयोमर्यादा : अनारक्षित उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे आणि कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वर्षे आहे.
अर्ज शुल्क – अनारक्षित प्रवर्गासाठी अर्ज शुल्क रु. 1000/- आहे, तर आरक्षित प्रवर्गासाठी ( माजी सैनिकांव्यतिरिक्त) रु. 900/- आहे. माजी सैनिकांना शुल्क माफ आहे.
इतका पगार मिळेल?
कनिष्ठ लिपीक- एस-६: रू १९,९००-६३,२००
विधी सहायक- एस-१४: रू ३८,६००-१,२२,८००
कर संग्राहक- एस-६: रू १९,९००-६३,२००
ग्रंथालय सहायक- एस-६: रू १९,९००-६३,२००
स्टेनोग्राफर- एस-१४: रू ३८,६००-१,२२,८००
लेखापाल/रोखपाल- एस-१३: रू ३५,४००-१,१२,४००
सिस्टीम अॅनालिस्ट- एस-१४: रू ३८,६००-१,२२,८००
हार्डवेअर इंजिनियर- एस-१४ : रू ३८,६००-१,२२,८००
डेटा मॅनेजर- एस-१४: रू ३८,६००-१,२२,८००
प्रोग्रमर- एस-८: रु २५,५००-८१,१००












