Murder in Jalgaon : जळगावात पुन्हा खून, संशयीत एलसीबीच्या जाळ्यात

जुलै 23, 2022 10:30 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२२ । जळगाव शहरातील खुनाचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. दोन दिवसापूर्वी शाहूनगरातील जळकी मील भागात खून झाल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा हरीविठ्ठल नगर परिसरात एका तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. (Murder in Jalgaon) दरम्यान, एलसीबीच्या पथकाने काही मिनिटात एका संशयिताच्या मुसक्या आवळल्या आहेत.

murder in jalgaon jpg webp

जळगाव जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच असून दर आठवड्याला कुठे ना कुठे खून झाल्याची घटना कानावर येत आहे. दोन दिवसांपूर्वी गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या तरुणाचा जळकी मिल रेल्वे ट्रॅकजवळ खून करण्यात आला होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन तिघांना अटक करण्यात आली आहे.

शुक्रवारी रात्री ८.३० च्या सुमारास हरिविठ्ठल नगर परिसरातील गणपती मंदिर बाजार पट्टा परिसरात लोखंडी रॉडने दिनेश भोई याच्या डोक्यावर वार करण्यात आले. जखमी अवस्थेत त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता त्याचा उपचार सुरू असताना रात्री ९.३० च्या सुमारास मृत्यू झाला.

घटनेची माहिती कळताच एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने धाव घेतली. संशयित विठ्ठल माऊली हटकर हा एका ठिकाणी लपला असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. एलसीबीचे विजय पाटील, प्रितम पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख यांनी विठ्ठल हटकर याळ ताब्यात घेतले.

घटनास्थळी गर्दी जमल्याने रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पथकाने संशयिताला ताब्यात घेत त्याच्याकडून रॉड हस्तगत केला आहे. जिल्हा रुग्णालयात नागरिकांची मोठी गर्दी जमली आहे. वैयक्तिक वाद आणि जुन्या वैमनस्यातून हा खून झाल्याचे समजते.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now