---Advertisement---
जळगाव शहर

मनपा अपडेट : अधिकारी घाणेरडी वागणूक देतात, काम होणार कशी? प्रभाग समिती आढावा बैठकीत सवाल

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२२ । मनपा अधिकारी मनपातील ठेकेदारांना घाणेरडी वागणूक देतात. तासनतास केबिन बाहेर उभे ठेवतात. काम करूनही कामांचे पैसे मिळत नाहीत. अशावेळी मनपाचे ठेके घेणार कोण आणि ठेकेदार काम करणार कशी? असा सवाल मनपातील ठेकेदारांनी प्रभाग समिती आढावा बैठकीत मांडला.

jalgoan mnp

रस्त्यांची डागडुजीची काम तात्काळ हवेत यासाठी लवकरात लवकर कामाला लागा. असे आमदार भोळे यांनी प्रभाग समिती आढावा बैठकीत सांगितले. मात्र जर ठेकेदारांना मनपा प्रशासनाकडून व्यवस्थित वागणूक मिळाली नाही, तासनतास बिलासाठी केबिनच्या बाहेर उभा राहावं लागलं तर ठेकेदार मनपाची काम करतील तरी कसे? असा सवाल ठेकेदारांनी बैठकीमध्ये उपस्थित केला.

---Advertisement---

महानगरपालिकेच्या पहिल्या माळ्यावरील सभागृहामध्ये आमदार राजूमामा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग समिती आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकी वेळी मनपा महापौर जयश्री महाजन, मनपा आयुक्त विद्या गायकवाड, उपायुक्त अभिजीत बाविस्कर, अतिरिक्त आयुक्त प्रशांत पाटील, एम.जी.गिरगावकर आदी अधिकारी उपस्थीत होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---