⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

मनपा विशेष : आता महाराष्ट्र शासन ठरवेल घनकचरा प्रकल्पाचे भविष्य

जळगाव लाईव्ह न्यूज ।मनपा विशेष । मनपा हद्दीतील आव्हाणे शिवारात मनपाचा घनकचरा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. मनपाकडून याच प्रकल्पाच्या ठिकाणी शहरातील दैनंदिन कचरा टाकला जात आहे. अशा कचऱ्याची विल्हेवाट न लावता येत असल्याने तो पेट घेत आहे. यातून विषारी धूर हा बाहेर पडत आहे. याचा त्रास नागरिकांना होत आहे.मात्र मनपासह लोकप्रतिनिधींचे हात वर असून ते यावर चक्कार शब्दही काढत नाहीयेत. मात्र यावर चर्चा करण्यासाठी सोमवारी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या बैठकीत काहीही निष्पन्न झाले नाही उलट जो शासन निर्णय येईल तोच मान्य करायचा असे ठरवण्यात आले.

या बैठकीला यावेळी महापाैर जयश्री महाजन, आयुक्त विद्या गायकवाड, उपमहापाैर कुलभूषण पाटील, विराेधीपक्षनेता सुनील महाजन, नितीन लढ्ढा, उपायुक्त प्रशांत पाटील, नगरसेविका शुुचिता हाडा, नगरसेवक कैलास साेनवणे, विशाल त्रिपाठी, दिलीप पाेकळे, नवनाथ दारकुंडे आदी उपस्थित हाेते.

या बंद पडलेल्या प्रकल्पामुळे हवेचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. पर्यायी हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. महासभेत मंजुरी मिळवूनही अद्याप हा प्रकल्प रखडला आहे.
शहरातून जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण सर्वाधिक असते. हा कचरा लवकर पेट घेतो आणि वातावरणामध्ये सल्फर डायॉक्साईडचे निर्मिती होते. ज्यामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकतं. मंक्तेदाराच्या मते त्याला स्टीलचा वाढीव भाव हवा आहे. मात्र अजून महापालिकेने काहीही निर्णय न घेतल्याने हा प्रकल्प पूर्ण कधी होईल हे सांगता येणार नाही.आज झालेल्या बैठकित असे ठरले कि, या बाबद जो शासन निर्णय होईल तोच निर्णय गृहीत धरण्यात येणार आहे.

अशावेळी घनकचरा प्रकल्पावर लवकरात लवकर निर्णय घेणे अतिशय गरजेचे आहे. सोमवारी यासंदर्भात सर्वपक्षीय विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे ‘जळगाव लाईव्ह’शी बोलताना आयुक्त विद्या गायकवाड यांनी सांगितले होते. या नुषंघाने बैठक पार पाडलीही मात्र यात ठोस निर्णय झाला नाही.