⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

अबब.. ! 48 पैशांच्या शेअरने दिला 2 लाख टक्के परतावा ; 1 लाख रुपयाच्या गुंतवणुकीचे झाले 28 कोटी

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२२ । झटपट पैसे प्रत्येकाला कमवायचे असतात. प्रत्येक जण आपापल्या परीने पैसे कामवितो. तर काही जण शेअर मार्केटमधून पैसे कामवितात. शेअर मार्केटमध्ये कमी कालावधीत मोठी रक्कम कमविता येते. शेअर मार्केटमध्ये जोखीम देखील पत्करावी लागते. काही शेअर मालामाल करून सोडतात तर काही शेअर कंगाल. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला अशा शेअरबद्दल सांगणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना 200000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. Multibagger Stock

अरमान फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे ​​(Armaan Financial Services Limited) शेअर्स 48 पैशांवरून 1300 रुपयांहुन अधिकने वाढला आहेत. अरमान फायनान्शियल सर्व्हिसेसचे मार्केट कॅप 1147 कोटी रुपये आहे. अरमान फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या समभागांची 52 आठवड्यांची उच्च पातळी 1387.75 रुपये आहे, तर कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 603.95 रुपये आहे.

1 लाखाचे 28 कोटींहून अधिक कमावले
NBFC कंपनी अरमान फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे ​​शेअर्स 11 मार्च 2004 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 48 पैशांच्या पातळीवर होते, जो १९ जुलै २०२२ रोजी BSE मध्ये १३४७ च्या पातळीवर बंद झाला. आता त्यानुसार बघितले तर, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 11 मार्च 2004 रोजी अरमान फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि आजपर्यंत गुंतवणूक ठेवली असती, तर आज त्याचे पैसे 28.14 कोटी रुपये झाले असते.

10 वर्षात दिलेला मजबूत परतावा
आता 10 वर्षाच्या परताव्याबद्दल बोलूया, तर अरमान फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडचे ​​शेअर्स 20 जुलै 2012 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 25.70 रुपयांवर व्यवहार करत होते. आता अशा परिस्थितीत जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि आपली गुंतवणूक तशीच ठेवली असती, तर यावेळी ही रक्कम 52.55 लाख रुपये झाली असती. खरं तर, 18 जुलै 2022 रोजी बीएसई 1350.75 रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे. अरमान फायनान्शिअलच्या शेअर्सने गेल्या एका महिन्यात गुंतवणूकदारांना 36% पेक्षा जास्त परतावा दिला आहे, तर कंपनीच्या शेअर्सनी गेल्या 6 महिन्यांत 71% परतावा दिला आहे.

येथे केवळ स्टॉकच्या कामगिरीची माहिती दिली आहे, हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करणे धोक्याच्या अधीन आहे आणि कृपया गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या सल्लागाराचा सल्ला घ्या.