जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२२ । सध्या जळगावमध्ये महाप्रबोधन सभा घेण्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांच्या मुक्ताईनगर (Muktainagar) येथील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होता. मात्र आता शिवसेनेकडून शिंदे गटाला आता ओपन चॅलेंज देण्यात आलं आहे. आता मुक्ताईनगरमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुक्ताईनगरमध्ये सभा होणार आहे.
मुक्ताईनगरची महाप्रबोधन सभा होऊ शकली नाही त्यामुळे आता मुक्ताईनगरमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा घेण्याचा ठाकरे गटाने निर्णय घेतला आहे. लवकरच मुक्ताईनगरमध्ये उद्धव ठाकरे सभा घेणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत (Sanjay Sawant) यांनी दिली.
दरम्यान, सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा जळगावात सुरु आहे. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, किशोर पाटील आणि चिमणराव पाटील यांच्या मतदारसंघात सुषमा अंधारेंच्या महाप्रबोधन यात्रेच्या सभा पार पडल्या.
त्यानंतर मुक्ताईनगरमध्ये ही त्यांची महाप्रबोधन सभा आयोजित करण्यात आलेली होती. मात्र पोलिसांनी सुषमा अंधारे यांच्या सभेवर बंदी घातली असून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे बोलले जातेय. त्यामुळे ही सभा रद्द करण्यात आली. मात्र आता उद्धव ठाकरेंची मुक्ताईनगर मध्ये सभा होणार आहे. लवकरच मुक्ताईनगरमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होईल, ती कुठे आणि कधी होणार या सभेची तारीख त्यानुसार घोषित करण्यात येणार आहे असंही, संजय सावंत यांनी स्पष्ट केलं.