⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

मुक्ताईनगरात रस्त्यामध्ये साचल्या गटारी!

Muktainagar News – जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगरतर्गत रस्त्यामध्ये गटारी साचल्या असून शहरवासियांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने शहरवासियांकडून नाराजी व्यक्त होत आहे. शिवाय शहरात अनेक समस्या असल्यामुळे येथील नागरिकांकडून आपण पाषाण युगात तर जगत नाही आहोत ना? असा उपस्थित होत आहे. तसेच प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी अशी मागणीत होत आहे.

एकीकडे पावसाळ्यात साथीच्या रोगांसंदर्भात प्रत्येक भागात लक्ष देत असताना प्रभाग क्र. 13 मध्ये नगरसेवकांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रभाग क्रमांक 13 मधील रेणुका माता मंदिराच्या वरदडीच्या रस्त्यात तर अक्षरशः पाण्याचे डबके साचले असून नागरिकांना पायी चालणे ही मुश्किल झाले आहे. शिवाय या भागात जास्त क्लासेस असल्यामुळे विद्यार्थ्यांना पायी चालणे व सायकलवरून चालणे धोक्याचे झाले आहे, विद्यार्थी रोज तेथून चिखलामध्ये पडत आहेत. साई मंदिरासमोर पाण्याचा मोठमोठे डबके साचल्याने असून मोठ्या प्रमाणावर डास तयार झाले आहेत.

एवढेच नव्हे तर प्रभागात असलेल्या अंगणवाडीत जायला लहान बालकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. इतपत संपुर्ण रस्त्यात पाणी साचलेले आहेत. प्रभागात मोठ्या प्रमाणावर गवत वाढले, भर दिवसा मोठे साप ह्या प्रभागात वावरताना दिसतात. समाधान माळी ते बीएसएनएल टॉवर पर्यंतच्या प्रभागाचा खुप मोठा विस्तार असून प्रभागात काही ठिकाणी सहज पायी चालता येत नाही. प्रभागात सर्वत्र गटारी तुडुंब भरले असून बऱ्याच दिवसांपासुन गटारींची सफाई झालेली नाही.

तसेच पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून पावसाचे पाणी झेलून प्रभागातील लोक आपला दिवस घालवत आहे. सुमारे एक आठवड्यापासून नळाला पाणी आलेले नाही. प्रभागात मूलभूत प्रश्नांच्या एवढ्या समस्या आहेत की आपण पाषाण युगात तर जगत नाही आहोत ना? असा प्रश्न नागरिक एकमेकांना विचारत आहेत. सोशल मिडीयातुन याबाबचे फोटो व्हायरल होत असतांना दिसुन येत आहे.

दरम्यान नगरसेवक कुंता अनिल पाटील याच्याशी याबाबत संपर्क साधला असता, या समस्यांना त्यानी दुजोरा दिला. “प्रभागरचना नवीन आहे त्यामुळे नागरी सुविधांचा अभाव असल्याचे त्यानी सांगितले. तसेच सदर प्रभाग क्षेत्रफळाच्या दृष्टीने खुप मोठा देखिल आहे. मात्र काही कारणास्तव सदरची कामे खोळंबली आहे.सदर ठिकाणी रस्त्याचे कामे मंजूर असून येत्या दोन महीन्यात रस्ते व गटारींचे कामे केले जातील.” असे “जळगाव लाईव्ह न्यूज”च्या प्रतिनिधीशी बोलतांना त्यानी सांगितले. मात्र सद्यास्थितीत शहरवासीयांना समस्यांना सामोरे जावे लागत असून संबंधित रस्त्याचे कामे कधी होताहेत याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.