महाराष्ट्रातील ‘या’ बँकेत ‘कनिष्ठ लिपिक’ पदांसाठी मोठी भरती ; पात्रता फक्त पदवी पास

नोव्हेंबर 5, 2023 1:04 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही बँकेत नोकरी मिळविण्यासाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक संधी चालून आलीय. महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्हा नागपूर स्थित एका अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत ‘कनिष्ठ लिपिक’या पदाकरिता दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स् फेडरेशन लि., मुंबई यांचे माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2023 आहे. पदाचा तपशील आणि महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत. MUCBF Bharti 2023

MUCBF Recruitment jpg webp

या भरती मार्फत एकूण 19 जागा भरल्या जातील. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. MUCBF Recruitment 2023

पदाचे नाव: कनिष्ठ लिपिक
आवश्यक पात्रता: शासन प्राप्त विद्यापीठाची पदवी, व MS-CIT किंवा समतुल्य

इतका पगार मिळेल
प्रथम सहा महिन्याकरिता : 15,000/-
त्यांनतर बारा महिन्याकरिता : 19,000/-
सेवेत कायम केल्यांनतर सुरुवातीचे वेतन दरमहा साधारण : 32,000/-

याची अट : 01 नोव्हेंबर 2023 रोजी 22 ते 35 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : ₹944/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 नोव्हेंबर 2023
परीक्षेचे स्थळ : नागपूर

अधिकृत संकेतस्थळ : mucbf.com
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now