बेरोजगार असलेल्यांना मोठी संधी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (MSRTC) काही पदासाठी भरती जाहीर करण्यात आलीय. जर तुम्हीही जॉबच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी उत्तम संधी ठरेल. MSRTC Bharti 2025

नाशिक विभागीय कार्यालयाद्वारे ही भरती जाहीर करण्यात आली असून ही भरती प्रामुख्याने आयटीआय (ITI) आणि अभियांत्रिकी पदवीधर किंवा पदविकाधारक उमेदवारांसाठी आहे. एकूण 367 रिक्त पदे भरली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑगस्ट २०२५ आहे. इच्छुकांनी सर्वात आधी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचे आहे.

प्रशिक्षणाचे ठिकाण नाशिक येथे असणार आहे. या नोकरीसाठी ITI/ अभियांत्रिकी पदवीधर/ पदविकाधारक उत्तीर्ण असणे गरजेचे आहे इच्छुक उमेदवारांचे वय 14 ते 30 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येतील.
या रिक्त पदांसाठी होणार भरती
ही भरती अभियांत्रिकी पदवीधर, इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक, मॅकेनिक (रेफ्रीजरेशन अँड एअर कंडिशनिंग), मॅकेनिक मोटार व्हेईकल, शिटमेटल वर्कर, वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रीक), पेन्टर, मॅकेनिक डिझेल, इलेक्ट्रिशियन, फिटर, टर्नर आणि कारपेंटर या पदांसाठी होणार आहे
असा करा अर्ज
सर्वात आधी www.apprenticeshipindia.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी (रजिस्ट्रेशन) करावी. त्यानंतर वेबसाइटवरच ऑनलाइन अर्ज भरावा. अर्ज भरल्यानंतर त्याचा नमुना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन, विभागीय कार्यालय, एन.डी.पटेल रोड, शिंगाडा तलाव, नाशिक येथे उपलब्ध होईल. तो नमुना घेऊन योग्य प्रकारे भरल्यानंतर, आवश्यक कागदपत्रांसह त्याच कार्यालयात सादर करावा लागेल. या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना नाशिक येथे प्रशिक्षण दिले जाईल.












